Metaverse-तंत्रज्ञानाची आभासी जागा / metaverse meaning in Hindi

तुम्ही काही दिवसापूर्वीच मेटावर्स  बद्दल ऐकलं असेल आज तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की कुठलीच गोष्टअशक्य राहिली नाही.हिंदीमध्ये याचा अर्थ ब्रह्मांड से परे असा होतो. (metaverse meaning in Hindi)

काय होईल जर मी म्हटलं तुम्ही मित्रासोबत फोनवर बोलण्याऐवजी जर मित्रच फोनच्या बाहेर येऊन तुमच्याशी चर्चा करायला लागली तर ऑफिसमधील मीटिंग तुम्ही घरी बसून अटेंड करू शकला तर

तुम्ही घरबसल्या कुठल्याही स्टेडियम मधील क्रिकेट, फुटबॉल किंवा इतर सामन्यांचा आनंद घेऊन ते स्टेडियमवर असल्याचा अनुभव घेता आला तर हे सगळं शक्य आहे.

metaverse meaning in Hindi

Metaverse-तंत्रज्ञानाची आभासी जागा

metaverse meaning in Hindi

मेटा वर्स  हा शब्द दोन शब्दांपासून बनलेला आहे मेटा + वरस मेटा म्हणजे च्या पलीकडे आणि वर्स म्हणजे युनिव्हर्स. एका प्रकारे हे एक असे आभासी जग आहे जे प्रत्यक्ष जगासारखे आहे.

हे एक आर्टिफिशियल युनिव्हर्स आहे निल स्टीफनसन यांच्या Snow crash (1992) सायन्स फिक्शन कादंबरीमध्ये त्यांनी मेटावर्स  शब्दाचा पहिल्यांदा वापर केला

त्यांनी या शब्दाचे वर्णन जसे मानव किंवा त्यांचे थ्रीडी अवतार हे 3D Virtual space  मध्ये एकमेकांशी संवाद करू शकतील.

आता तर खूप कंपन्या आपल्या स्वतःच्या आभासी विश्वाची रचना करत आहेत तर काही कंपन्या त्यामध्ये असणाऱ्या अवतारावर काम करत आहे

Gadar-2 Movie Release Date

या आभासी विश्वात तुम्ही जाऊ शकता एका अवताराच्या स्वरूपात म्हणजेच तुमचे ते एक थ्रीडी मॉडेल असेल अगदी हुबेहू तुमच्यासारखे

ते तुमचे थ्रीडी मॉडेल कुठेही जाऊ शकते ते पण एका क्लिकवर तुम्हाला जर अमेरिकेत जायचे तर ते एका क्लिकमध्ये शक्य आहे क्लिक करा आणि प्रवेश करा

एका अभासी विश्वात जिथे सर्व गोष्टी या खऱ्याखुऱ्या असल्याचा भास होतो अगदी चंद्रावरही जाता येईल.

हे वर्चुअल रियालिटी, ऑर्गुमेंटेड रियालिटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांचं मिश्रण आहे तर चला आपण जाणून घेऊयात वर्चुअल रियालिटी बद्दल.

वर्चुअल रियालिटी म्हणजे काय?What is Virtual Reality?

वर्चुअल रियालिटी म्हणजे आभासी वास्तविकता. आभासी म्हणजे एखादी गोष्ट प्रत्यक्षात तिथे नसणे

पण तिथे असल्याचा आपल्याला भास होतो.रियालिटी म्हणजे आपण जे बघतोय तेच आपल्यासमोर असते

तंत्रज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर वी आर म्हणजे कम्प्युटरवर तयार केलेले थ्रीडी वातावरण

यामध्ये आपण आपल्या थ्रीडी अवतारा सह त्यामध्ये प्रवेश करू शकतो व आपण प्रत्यक्षात तिथं असल्याचा अनुभव आपल्याला देते.

वर्चुअल रियालिटीचा अनुभव आपण हेडसेट द्वारे घेऊ शकतो त्या हेडसेटला डोक्यावरती बसवायचे

मग समोर आपल्याला एक स्क्रीन दिसते हे वापरत असताना आपल्याला आजूबाजूच्या कुठल्याही गोष्टी दिसत नाहीत

ह्या हेडसेटमध्ये डोळ्यांची, पापण्यांची व डोक्याचे हालचाल पाहणारे सेन्सर्स बसवलेले असतात काही हेडसेटवर

आवाजासाठीही हेडफोन्स आहेत

आपल्या दोन्ही डोळ्यांना वेगवेगळे चित्र दिसतं पण मेंदूमध्ये प्रतिमा तयार होताना दोन्ही चित्र एक होऊन प्रतिमा तयार होते याचाच वापर करून हे तंत्रज्ञान तयार केल जात आहे.

वर्चुअल रियालिटी मध्ये आपण कुठले अनुभव घेऊ शकतो ?

पर्यटन स्थळांचा घरबसल्या आनंद घेऊ शकतो

अनेक गेम्स वि आर साठी बनवले जात आहे गेमर साठी हे एक वरदानच म्हणावं लागेल.

आपण क्रिकेटचे सामने चक्क मैदानात उभे राहून पाहत असल्याचा अनुभव घेऊ शकतो.

जंगल सफारीसाठी जंगलात जाऊन प्राण्यांच्या जवळ फिरण्याचा अनुभव घेऊ शकतो.

ऑगेमेंटेड रियालिटी म्हणजे काय ?What is Augmented Reality?

ऑगेमेंटेड रियालिटी वि आर पेक्षा खूप वेगळे आहे. VR मध्ये आपल्याला डोळ्यांवर यंत्र परिधान करावे लागते ज्याप्रमाणे आपण डोळ्यावर चष्मा लावतो त्याप्रमाणे हे उपकरण असते

हे उपकरण डोळ्यावर लावले असता आपण त्या जगात प्रवेश केल्याचा भास होतो पण प्रत्यक्ष जगात ते अस्तित्वात नसते ते फक्त आपण उपकरणाच्या सहाय्याने बघतो

परंतु जर आपण AR हेडसेट घातले तर आपण सभोवतालचे प्रत्येक गोष्ट बघू शकतो तसेच

आपण त्या वातावरणामध्ये AR  संगणकाद्वारे बदल देखील करू शकतो आणि

आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी लिंक वरती क्लिक करा. Artificial Intelligence

मेटावर्समध्ये आपण काय करू शकतो ?

तुम्ही सगळे करू शकता जे खऱ्या खऱ्या आयुष्यात तुम्ही करू शकत नाही

उदाहरणार्थ एका क्लिकवर कुठल्याही देशात जाऊ शकतो एका क्लिकवर तुमच्या थ्रीडी अवताराचे स्वरूप बदलू शकता.

जे तुम्ही खऱ्या आयुष्यात करता ते तुम्ही इथे करू शकता उदाहरणार्थ मित्रांशी बोलणे, ऑफिस मधील मीटिंग

,खेळणे,फिरणे घरबसल्या तुम्ही कॉलेजमधील प्रॅक्टिकल करू शकता त्यासाठी कॉलेजला जायची गरज नाही. 

तुम्ही विविध खेळ खेळू शकता क्रिकेट फुटबॉल टेनिस आणि विशेष म्हणजे हे प्रत्यक्षात खेळतायेत याचा अनुभव

तुम्हाला येईल व तुम्ही थकणार पण नाही कारण यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष खेळणार नाही तर तुमचा थ्रीडी अवतार ते खेळ खेळणार.

या मेटावर्स  मध्ये तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक शिक्षक बॉस यांचे थ्रीडी अवतार ते बनवतील व त्यांच्याशी त्या थ्रीडी अवतर अशी आपण बोलू शकतो

यामध्ये तुम्ही बुर्ज खलिफा या उंच टावर्स मधून पडल्यावर कसे वाटेल याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकता.

साधारणता हा एक प्रकारचा गेम आहे यामध्ये शून्यापासून सुरुवात करून त्यामध्ये पैसे कमवून मग विविध थ्रीडी अवतार बदलायची व डिजिटल जगामध्ये  डिजिटल  आयुष्य सुरू करायचे

यामध्ये विविध गोष्टी शिकायच्या जगातल्या कुठल्याही ठिकाणी जाऊ शकता विशेष म्हणजे आजारी पडण्याची भीती नाही अर्थातच मरणाची सुद्धा भीती नाही.

मेटावर्स  मध्ये प्रवेश करण्यासाठी लागणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाय स्पीड इंटरनेट,स्मार्टफोन, कम्प्युटर, वर्चुअल रियालिटी ग्लासेस इत्यादी.(metaverse meaning in Hindi)

मेटावर्स  चे फायदे | Advantages of metaverse

अनेक व्यवसाय मेटावर्स  मध्ये येऊ पाहत आहेत त्यामुळे नोकरीच्या खूप साऱ्या संधी उपलब्ध होतील या मेटावर्स मध्ये तुमचा थ्रीडी अवतार असेल तर या अवतारासाठी तुम्हाला कपडे लागतील

ते तुम्हाला मेटा वर्स मध्ये विकत घ्यायचे आहे तर त्यासाठी फॅशन डिझायनर लागेल तो त्या थ्रीडी अवतारासाठी कपडे डिझाईन करेल.

त्यामध्ये फक्त तुमचे थ्रीडी अवतार जातात त्यामुळे तिथे तुम्हाला शारीरिक इजा होण्याचा धोका कमी आहे यामुळे गुन्हेगारी कमी होईल असा अंदाज वर्तवला जातोय 

सर्वच व्यवहार आभासी चलनाद्वारे होतील त्यामुळे चोरी दरोडा यांचा धोका कमी होईल. या डिजिटल जगात तुम्हाला मित्राला भेटण्याची खरेदी करण्याची संधी मिळते

मेटावर्स हे ऑगेमेंटेड रियालिटी, वर्चुअल रियालिटी, मशीन लर्निंग ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजंस यांचा समावेश यात आहे.

मेटावर्सचे तोटे| Disadvantage of metaverse

पोलीस सुरक्षा यंत्रणा किंवा आपत्कालीन यंत्रणा सध्या यामध्ये उपलब्ध नाही त्यामुळे हॅकिंगची शक्यता आहे यात दुमत नाही मेटावर्स बद्दल माहिती नसल्याने अडचण येऊ शकते

मेटावर्स मध्ये अनेक टेक कंपन्या भाग घेत आहेत व नवनवीन वैशिष्ट्ये त्यामध्ये ऍड करत आहेत त्यामुळे भविष्य

हे मेटाव्हर्स मध्ये आहे पण माणूस यामुळे आळशी बनेल थोडी शारीरिक मेहनत करणार नाही सगळं आभासी विश्वास त्याला खरं वाटू लागेल.

मेटावर्स ची उदाहरणे |Example of meta verse

  • Pokemon GO
  • Roblox
  • Horizon
  • Second life game.

Posted

in

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *