Chat GPT बद्दल माहिती

Chat GPT

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात सर्वत्र चॅट जीपीटीची चर्चा आहे आणि बऱ्याच जणांच्या मनात खूप सारे प्रश्न आहेत.Chat GPT

सर्वांना चॅट जीपीटी बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे.Chat GPT हा असा चॅटबोट आहे

ज्यामध्ये आपण आपले प्रश्न टाईप करू शकतो आणि काही क्षणातच आपल्याला आपले उत्तर AI मदतीने तिथे मिळेल.

थोडक्यात काय तर आपण यासोबत चॅटिंग करून माहिती मिळू शकतो चॅट जीपीटी एक जादूची कांडी आहे.

AI (Artificial Intelligence) चे प्रगत रूप आहे User साठी असिस्टंट सारखं काम करते.

फ्युचर टेक्नॉलॉजी

ओपन AI  ही एक संशोधन आणि उपयोजन कंपनी आहे आणि ती सध्या या चॅटबोट वरती काम करत आहे

यातील त्रुटी शोधणे व नवनवीन फीचर्स यामध्ये समाविष्ट करण्याचा त्यांचा भर आहे.

याच नवीन वर्जन आपल्याला थोड्याच दिवसात पाहायला मिळू शकते. ज्या दिवसापासून चॅट जीपीटी  इंटरनेट वरती आले तेव्हापासून लोकांनी त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे.

Movie Review

चॅट जीपीटी वापरून आपण बऱ्याचशा गोष्टी काही क्षणात करू शकतो. चॅट जीपीटी टूल सध्या बाल्यावस्थेत आहेत

परंतु थोड्याच दिवसात या टूलने इंटरनेट वरती खूप मोठा धुमाकूळ घातला आहे.

जनरेटिव्ह ए आय ही टेक्नॉलॉजी नावाप्रमाणेच आहे ती नवनवीन कंटेंट बनवते जसे व्हिडिओज,

इमेजेस हे स्वतःहून ते जनरेट करू शकते.त्यापैकी चॅट जीपीटी हे फक्त टेक्स्ट फॉरमॅट मध्ये आहे इमेजेस किंवा व्हिडिओ जनरेट करत नाही.

Chat GPT म्हणजे काय?

चॅट जीपीटी हे एक ओपन AI या संशोधन आणि उपयोजन कंपनीने बनवले आहे.

AI च्या साह्याने काम करते. जेव्हा आपण चॅट जीपीटी वरती आपल्याला पाहिजे तो प्रश्न टाईप करतो तेव्हा ते आपल्याला सविस्तर उत्तर देते त्यामुळे सध्या ते लोकांमध्ये खूप चर्चेत आहे.

जेव्हा आपण गुगल वरती काही सर्च करतो

तेव्हा गुगल आपल्याला त्या विषयाशी संबंधित खूप साऱ्या वेबसाईट आपल्यासमोर येतात

पण चॅट जीपीटी आपल्याला तेच उत्तर सविस्तर देते.

Chat.openai.com ही त्यांची अधिकृत वेबसाईट आहे.चॅटिंग करून नवीन नवीन माहिती मिळवू शकतो सध्या चॅट जीपीटी चे जगभरात शंभर मिलियन यूजर आहेत आणि हा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे.

Chat GPT

Chat GPT चा फुल फॉर्म काय? / Full form of Chat GPT

तुम्ही कुठे ना कुठे ऐकले असणारच पण त्याचे पूर्ण नाव तुम्हाला माहित आहे का Chat GPT चा फुल फॉर्म

Chat Generative Pre-Training Transformer असे आहे. याद्वारे आपण यूट्यूब व्हिडिओ स्क्रिप्ट,निबंध, रिझ्युम, कव्हर लेटर  इत्यादी लिहून दिले जाऊ शकते.

Chat GPT चा इतिहास. /History of Chat GPT

लार्ज लैंग्वेज मॉडेल वरती आधारित आहे आहे ज्यामध्ये डीप लर्निंग तंत्राचा उपयोग केला आहे. 2015 मध्ये सॅम अल्टमन, स्पेस एक्स आणि टेस्लाचे मालक इलान मस्क यांनी या प्रोजेक्टवर काम केले

पण काही वर्षानंतर इलान मस्क या प्रोजेक्ट म्हणून बाहेर पडले त्यानंतर मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांनी या प्रोजेक्टवर खूप मोठी रक्कम गुंतवली.

३० नोव्हेंबर 2022 रोजी Chat GPT चा प्रोटोटाईप लॉन्च करण्यात आला. chatgpt founder सॅम अल्टमन यांच्या म्हणण्यानुसार Chat GPT लाँच झाल्यानंतर एका आठवड्यातच दहा मिलियन लोकांपर्यंत पोहोचली होती.

Chat GPT कसे काम करते? /How does Chat GPT work? 

ओपन AI द्वारे तयार केलेले लार्ज लैंग्वेज मॉडेल वरती आधारित आहे आणि हे डीप लर्निंग चा वापर करून माणसासारखा मजकूर लिहू शकते.

जीपीटी 3 भाषा मॉडेल वापरून ते तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकते, ब्लॉग पोस्ट लिहू शकते,ई-मेलचा मसुदा तयार करू शकते भिन्न प्रोग्रामिंग भाषांमध्ये कोड समजावून सांगू शकते,

कुठलीही कविता लेख एका भाषेतून दुसऱ्या भाषांमध्ये अनुवादित करू शकते  अशाप्रकारे हा एक उपयुक्त चॅटबोट आहे.

जीपीटी 3 हा एक अल्गोरिदम आहे तो कुठल्याही मजकुराला विविध भाषेत भाषांतरित करून

शब्दडेटांचा क्रम लावून नंतर विश्लेषण करून त्यावर आधारित ओरिजनल आउटपुट जनरेट करतो व

हे आउटपुट टेक्स्ट स्वरूपात असते.

Chat GPT चा वापर कसा करावा? /Chatgpt login

Chat GPT वापरण्यासाठी सर्वात पहिले तुमचे खाते त्यात तयार करावे लागेल त्यानंतरच तुम्ही हे. वापरू शकता.

सध्या चॅट जीपीटी पूर्णतः मोफत आहे पण भविष्यात हे सशुल्क होऊ शकते हे वापरण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो करा.

सर्वप्रथम तुमच्या ब्राउझरमध्ये तुम्हाला Chat.openai.com टाईप करून या वेबसाईटवर जावे लागेल किंवा

गुगल वर जाऊन चाट जीपीटी सर्च करून देखील तुम्ही या वेबसाईटवर जाऊ शकता. यानंतर टाईप चॅट जीपीटी ऑप्शन वरती क्लिक करा.

इथे तुम्हाला लॉगिन व साइन अप असे दोन ऑप्शन दिसतील त्यातील साइन अपवर क्लिक करावे लागेल

तुम्ही ईमेल आयडी मायक्रोसॉफ्ट अकाउंट किंवा जीमेल आयडी वापरून चॅट जीपीटी मध्ये अकाउंट तयार करू शकता.

जीमेल आयडी वरून अकाउंट बनवण्यासाठी Continue with Google वर क्लिक करा यानंतर तुम्हाला तुमचे नाव टाकावे लागेल Date of Birth टाकावे लागेल.

नंतर तुमचा फोन नंबर त्यामध्ये प्रविष्ट करावा लागेल आणि नंतर कंटिन्यू वर क्लिक करावे लागेल

तुम्ही टाकलेल्या फोन नंबर वरती एक ओटीपी येईल

तो तुम्हाला तिथे टाकायचा आहे फोन नंबरची खात्री झाल्यानंतर तुम्ही तुमच्या खाते वापरण्यासाठी तयार आहात.

दिलेल्या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला विचारायचा प्रश्न त्यात प्रविष्ट करा आणि प्रश्नाच्या समोरील आयकॉनवर क्लिक करा

तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर लिखित स्वरूपात मिळेल अशा पद्धतीने आपण चॅट जीपीटी वापरू शकतो.

Chat GPT चे फायदे / Advantage of Chat GPT

वेळेसोबत शिकते व स्वतःमध्ये सुधार करते व आपणास अचूक माहिती देण्यासाठी सक्षम बनते

जसजसे लोक चॅट जीपीटी चा वापर करतात त्या इनपुट मधनं चॅट जीपीटी अधिक अचूक आणि व्यापक

उत्तर देण्याची क्षमता विकसित करते. चॅट जीपीटी 24/7 उपलब्ध आहे त्यामुळे युजर त्याला हव्या त्या वेळेत तो माहिती शोधू शकतो.

त्याची नैसर्गिक भाषा प्रक्रिया (Natural Language Processing) क्षमता. Chat GPT मानवी भाषेला समजून त्यास प्रतिसाद देते त्यामुळे आपण मातृभाषेमध्ये टाईप करून देखील आपल्याला हवी ती माहिती मिळू शकतो.

Chat GPT चे नुकसान /Disadvantage of Chat GPT

चॅट जीपीटीचे सर्वात मोठे नुकसान म्हणजे त्याद्वारे दिली जाणारी माहिती नेहमी अचूकच असेल असे नाही काही वेळा त्यातही चुका होऊ शकतात हे एक मशीन लर्निंग मॉडेल आहे .डेटा पॅटर्न किंवा डेटा मधील ट्रेंड म्हणून शिकते त्यामुळे ते युजर्सला कधीकधी अचूक उत्तर देते किंवा योग्य प्रतिसाद देत नाही.

चॅट जीपीटी हा अनुभवात्मक किंवा भावनिक दृष्ट्या प्रगल्भ नाही त्यामुळे तुम्ही त्याला जर मानसिक आरोग्य व

भावनिक समस्या असलेले प्रश्न विचारत असाल तर ते तुम्हाला संवेदनशील किंवा अचूक उत्तर देऊ शकते

अशा परिस्थितीत थेरपीस्ट किंवा डॉक्टरशी संपर्क साधून योग्य ते मार्गदर्शन घ्यावे.

Chat GPT मधनं पैसे कसे कमवायचे?/ How can we use chatgpt to make money?

चॅट जीपीटी मधून पैसे कमवण्याची विविध मार्ग आहेत पण त्यातील काही मार्ग खालील प्रमाणे आहेत.

चॅटबोट टेम्प्लेट्स: जर तुम्ही Chat bot टेम्प्लेट चांगल्या प्रकारे बनवत असाल तर तुम्ही डेव्हलपर्स वापरू शकतील

असे टेम्प्लेट्स बनवू शकता आणि ते तुम्ही Chat fuel किंवा Many chat यासारख्या ऑनलाईन मार्केट प्लेस वरती विकू शकता.

फ्रीलान्सिंग: तुम्ही स्वतः चॅटबोट डेव्हलपर म्हणून काम करू शकता व Up work, Freelancer ,Fiverr   यासारख्या Free प्लॅटफॉर्मवर Client शोधू शकता आणि अर्निंग करू शकता.


Posted

in

by

Tags:

Comments

One response to “Chat GPT बद्दल माहिती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *