Artificial Intelligence-आयुष्य बदलणारी टेक्नॉलॉजी

Artificial Intelligence

मित्रांनो तुम्ही कुठे ना कुठे Artificial Intelligence बद्दल नक्कीच ऐकलं असणार आपणा सर्वांना माहिती आहे की वर्तमान युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे.Artificial Intelligence

Artificial Intelligence तंत्रज्ञानाच्या युगात एक परिवर्तन आहे ज्यामुळे बऱ्याचशा गोष्टी सहज व सोप्या होतील

आपल्याला लहानात लहान काम जरी करायचं म्हटलं तरी तंत्रज्ञानाची गरज भासते परंतु येणाऱ्या काळामध्ये

आपल्याला Artificial Intelligence ची खूप मदत होणार आहे.

जसे आपण कम्प्युटरला किंवा मशीनला कमांड देतात आणि त्या कमांडला फॉलो करून मशीन किंवा कम्प्युटर तुम्हाला आउटपुट देते पण

Artificial Intelligence मुळे कम्प्युटरला कमांड देण्याची गरज भासणार नाही कॉम्प्युटर स्वतःचे काम स्वतः करेल व आपला वेळ वाचेल.

ए आय म्हणजे काय ? Artificial Intelligence in Marathi

Artificial Intelligence म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता होय. या भूतलावरती फक्त मानवच असा प्राणी आहे जो विचार करू शकतो आणि जो विचार करू शकतो त्यालाच तर बुद्धिमान म्हणतात पण आजच्या या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपण मशीनला देखील मानवाप्रमाणे विचार करण्यासाठी प्रवृत्त करू शकतो

मशीन देखील स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतील कृत्रिम बुद्धिमत्ता मशीन्स मध्ये बसवण्यासाठी आपल्याला एखाद्या सॉफ्टवेअर प्रोग्राम ची मदत घ्यावी लागते. Artificial Intelligence चांगली संकल्पना आहे

याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सेल्फ ड्रायव्हिंग कार ज्यामध्ये कुठलाही ड्रायव्हर नसताना गाडी चालू शकते कार स्वतःच स्वतःची निर्णय घेणार कुठे वळायचं, कुठे थांबायचं, कुठं ब्रेक मारायचा

अर्थातच या कार मध्ये जीपीएस असणार या जीपीएसच्या सहाय्याने त्या रस्ता शोधणार सेन्सरच्या मदतीने

कारसमोर कारच्या मागे किंवा आजूबाजूला कोण किती अंतरावर आहे यावर कार स्वतः निर्णय घेणार.

असे मानले जाते की जसा याचा भविष्यात खूप फायदा होणार आहे तसेच त्याचे नुकसान देखील होऊ शकते 

जसे रोबोट विचार करू लागले त्यांच्यामध्ये भावना असतील तर ते मानवा विरुद्ध बंड ही पुकारू शकतात त्यामुळे मनुष्य व मशीन त्यामध्ये युद्ध ही होऊ शकते

आपण थोड्याच दिवसात हे बघणार आहोत जिथे रोबोट रस्त्यावर चालत आहे जी स्वतःची निर्णय स्वतःच घेत आहे.

Entertainment

AI चे प्रकार | Types of AI

1. Weak Artificial Intelligence (कुमकुवत कृत्रिम बुद्धिमत्ता)

आपण जेव्हा कुठल्याही शॉपिंग ॲप वरून कुठलाही प्रॉडक्ट चेक करतो तेव्हा तुम्हाला दुसऱ्या ॲप मध्ये किंवा साइटवर त्याची जाहिरात दिसते त्याला कुंमकूवत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात उदाहरण.

तुम्ही एचपीच्या लॅपटॉप साठी ॲमेझॉन वरती सर्च केलं आणि नंतर तुम्ही इंस्टाग्राम ओपन केलं त्यामध्ये तुम्हाला एचपी लॅपटॉपची जाहिरात खूप वेळ दिसते किंवा तुम्ही कुठलाही साईट वरती सर्च करता

तेव्हाही तुम्हाला त्या एचपी लॅपटॉप बद्दलच माहिती दिसते  आणि तुम्ही you tube वरती काही सर्च करता तेव्हाही तुम्हाला त्या एचपी लॅपटॉप ॲडवर्टाइजमेंट दिसते.

2. Strong Artificial Intelligence (शक्तिशाली कृत्रिम बुद्धिमत्ता) 

आपण जो विचार करू शकतो त्या सारखेच मशीन किंवा रोबोट सुद्धा विचार करू शकतात यालाच स्ट्रॉंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा शक्तिशाली कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात.

Artificial Intelligenceचा इतिहास |History Of AI

1956: JOHN McCarthy यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द 1956 मधील कॉन्फरन्स मध्ये पहिल्यांदा वापरला.

1969: शाकी हा पहिला सामान्य उद्देशीय मोबाईल रोबोट बनवला गेला हा सूचनांच्या विरुद्ध काम करण्यास सक्षम होतात.

1997: सुपर कॉम्प्युटर ‘‘डीप ब्ल्यू’’ डिझाईन करण्यात आला आणि त्याने एका सामन्यात विश्वविजेत्या

बुद्धिबळपटूचा पराभव केला हा मोठा संगणक तयार करणे हा आयबीएम चा एक मोठा टप्पा होता.

2002: पहिले व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी रोबोटिक व्याक्युम क्लिनर तयार केले.

2005-2019: आज एआय मध्ये स्पीच रिकॉग्निशन, रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन, डान्सिंग रोबोट आणि यासारखे अनेक नवकल्पनांनी प्रदारपण केले आहे.

2020: Baidu ने SARS-Cov-2 (कोविड-19) महामारीच्या सुरुवातीच्या टप्प्यात लस विकसित करणाऱ्या

वैज्ञानिक किंवा वैद्यकीय संघांना Linear fold Algorithm उपलब्ध केले या अलगोरिदम द्वारे केवळ 27 सेकंदात

वायरसच्या RNA (Ribonucleic Acid) क्रमांक अंदाज लावू शकतो ही पद्धत इतर पद्धतीपेक्षा 120 पट अधिक वेगवान आहे.

AI चा वापर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये केला जातो?|Application of artificial intelligence.

जवळजवळ सगळ्या क्षेत्रामध्ये यायचा वापर केला जातो परंतु काही क्षेत्र अशी आहे ज्यामध्ये AI चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो ती क्षेत्र पुढील प्रमाणे आहेत.

Manufacturing and production

Sport analytics or activities

Retail Shopping

AI का महत्त्वाचे आहे?

नवीन नवीन प्रकल्प मध्ये किंवा उद्योगधंद्यांमध्ये कार्यक्षमता किंवा उत्पादकता वाढवण्याची क्षमता AI मध्ये आहे.

उदाहरण वैद्यकीय क्षेत्रात Artificial Intelligence च्या साह्याने रुग्णाला होणारे संभाव्य धोके ओळखून रुग्णांच्या डेटांचे योग्य विश्लेषण करून त्यावर योग्य तो इलाज केला जाऊ शकतो.

Artificial Intelligence मुळे प्रकल्पांमध्ये सुरक्षा सुधारण्याची क्षमता येईल जसे सेल्फ ड्रायव्हिंग कार

AI च्या मदतीने चालतात त्यामुळे रस्त्यावरील अडथळे ते ओळखू शकतात व मानवी चुका टाळून अपघात होण्याचा धोका कमी होईल.

अपंग व्यक्तींसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात ॲमेझॉन अलेक्सा किंवा गुगल होम हे अपंग सहजपणे वापरू शकतात त्यामुळे त्यांचे काम ते सहजरीत्या करू शकतात. AI तंत्रज्ञानाच्या या महाजालामध्ये एक अभूततपूर्व बदल घडवून आणेल यात दुमत नाही.

AI ची उदाहरणे

 1. फेशियल डिटेक्शन अंड रेकग्निशन

 2.  चॅट बॉट

 3.  डिजिटल असिस्टंट

 4. इ पेमेंट

 5.टेक्स्ट एडिटर

अणुयुद्धाइतकाच धोका कृत्रिम बुद्धिमत्तेत?

Open AI, Google Deep mind  Anthropic या तीनही  कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्या आहेत त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कंपनीतील उच्च पदावरील अधिकारी आणि इंजिनियर्सना सोबत घेऊन 350 अक्षरांचे निवेदन तयार केले.

त्या निवेदनामध्ये अत्यंत कठोर शब्दात इशारा दिला आहे हे तंत्रज्ञान जितके फायदेशीर आहे तितकाच याचा मानवी जीवनाला धोका आहे याचा महामारी किंवा अनुयुद्धाइतकाच धोका आहे हे ओळखून योग्य ते पाऊल टाकण्याची गरज आहे

ज्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेला नवीन प्रगत रूप दिले तेच जर असा गंभीर इशारा देत असतील तर खरंच चिंतेची बाब आहे अमेरिकेत कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी खूप चर्चा आहे याचे नियमन करावे का? करावे तर कसे करावे?

Open AI, Google Deep mind, anthropic या तीनही कंपन्यांचे CEO अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडन उपाध्यक्ष कमला हरीश यांची भेट घेतली व त्यांना धोक्याची सूचना दिली.

या सर्वांना धोका वाटतोय तो लाज लैंग्वेज मॉडेलचा यातून तयार होणारे चित्र किंवा व्हिडिओ कसे

असतील याची भाषांतर किंवा रूपांतर किती प्रकारात होईल आणि ही माहिती काही क्षणात युजरला उपलब्ध होईल

अशी टेक्नॉलॉजी केवळ सुविधांपुरतीच मर्यादित न राहता भलत्या हातात किंवा भलत्या हेतूसाठी वापरले गेले तर समाजात हाहाकार माजू शकतो

आणखी दुसरे म्हणजे नोकरी जाऊ शकतात अनेक मानवी काम मशीन करू शकत असल्याने काही प्रकारच्या सेवा पूर्णता मानव विरहित होईल.


Posted

in

by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *